Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांचा गव्हाणमध्ये सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020 मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.

इयत्ता दहावी अर्थात एचएससी परीक्षा मार्च 2020 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी विद्यार्थिनी ऋतुजा सागर रंधवे, द्वितीय मीनाक्षी गणेश शिरतोडे, तृतीय पूजा अनिल बगाटे, चतुर्थ ऋतिका विजय पवार, पाचवा विद्यार्थी स्वयंम् प्रमोद कोळी तसेच इयत्ता बारावी अर्थात एचएससीमध्ये कला शाखा प्रथम ज्योती बबन टेकुडे, द्वितीय रसिका प्रभाकर घरत तसेच वाणिज्य शाखा प्रथम सेजल रमेश ठाकूर, द्वितीय पायल अशोक मोकल, तृतीय साक्षी नरेश ठाकूर आदी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी ग्रामपंचायत सदस्य विजयशेठ घरत, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर, पर्यवेक्षक दिपक भर्णुक, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply