Breaking News

गुणे हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर होणार मोफत उपचार

पनवेल : वार्ताहर

डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू रुग्णांची तपासणी फी न घेता, तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देऊन एक आगळा वेगळा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

प्रसिद्ध डॉ. गोविंद गुणे यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना सेवा शुल्क देण्याचा कधीही आग्रह केला नाही. वडिलांच्या या कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरगरीब रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती आहे.

आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे रुग्ण तपासणी फी आकारणार नाहीत, तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देतील. या रुग्णांनी शनिवारच्या तपासणीसाठी पूर्व नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी 022-27453033, 022-27453992, 09920763089 व 09869793224 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निशुल्क तपासणीतून पुढील उपचारांची गरज भासणार्‍या रुग्णांना (उदा. रुग्णालयातील डमिशन किंवा शस्त्रक्रिया) डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे वैयक्तिक फि आकारणार नाहीत. इतर सर्व खर्च (उदा. औषधे, शस्त्रक्रिया, साहित्य, भूलतज्ञांची फी, रक्त व इतर आवश्यक तपासण्या) रुग्णांस करावयाचा आहे. या सुविधेचा लाभ सर्वसाधारण कक्षातील दाखल रुग्णांसाठी असेल व त्याची सुरूवात आजच्या शनिवार (दि. 22) पासून करत असल्याची माहिती डॉ. गिरीश गुणे यांनी दिली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply