
पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे व ग्रामस्थ अमोल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सोमवारी (दि. 3) सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच हरेश बांडे, ग्रामसेवक म्हात्रे, अमोल जोशी, सदस्य मनोज पवार, प्रभावती कार्लेकर, नितू गायकवाड, उपासना गोठळ, कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पवार यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper