Breaking News

गेल पुन्हा बरसला!

44 चेंडूंत ठोकल्या 94 धावा

ओटावा : वृत्तसंस्था

कॅनडाच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये ख्रिस गेलचा झंझावात कायम असून, त्याने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गेलच्या फटकेबाजीचा या वेळी एडमोंटन रॉयल्स संघाला दणका बसला.

व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना 165 धावांचे आव्हान केवळ 16.3 षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी त्यांनी केवळ चार गडी गमावले. यात ख्रिस गेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने तुफानी खेळी केली. गेलने 44 चेंडूंत 214च्या स्ट्राइक रेटने सहा चौकार आणि नऊ षटकार खेचत 94 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याचा संघ विजयासमीप आला, पण दुर्दैवाने गेलचे शतक हुकले.

प्रथम फलंदाजीस आलेल्या रॉयल्सची सुरुवातच खराब झाली. नवनीत धलीवाल (5), रिचर्ड बेरींग्टन (1) व कर्णधार मोहम्मद हाफिज (6) हे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. बेन कटींग व मोहम्मद नवाझ यांनी संघाचा डाव सावरला. कटींगने 41 चेंडूंत तीन चौकार व सात षटकार ठोकत 72 धावांची खेळी केली, तर नवाझने 27 चेंडूंत 40 धावा केल्या. त्यामुळेच रॉयल्सला 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

आव्हानाचा पाठलाग करताना नाइट्सचा सलामीवीर टोबियास व्हीसे केवळ एका धावेवर माघारी परतला. खराब सुरुवातीनंतर नाइट्सच्या संघाची अवस्था 8 षटकांत 2 बाद 58 अशी होती. त्यानंतर गेलच्या फलंदाजीने वेग पकडला. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत तुफान खेळी करून संघाला विजयासमीप पोहोचवले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply