नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करीत शतक लगावले. त्याने या वादळी खेळीत 12 षटकार व 7 चौकारांसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या.
अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने केवळ 19 चेंडूंत शतकी खेळी साकारली. गेलव्यतिरिक्त व्हॅन डेर ड्यूसेनने 25 चेंडूंत 56 धावा केल्या. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर व्हँकोव्हर नाइट्सने मॅन्ट्रियल टाइगर्सच्या विरुद्ध 20 षटकांत 276 धावांचा डोंगर उभा केला, मात्र एवढ्या धावा करूनसुद्धा गेलच्या टीमला विजयापासून दूरच रहावे लागले. कारण खराब हवामानामुळे दुसरा डाव झाला नाही आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper