उरण : रामप्रहर वृत्त
सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने होळीनिमित्त रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित आहे.
स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश फी नाही. स्पर्धेची तयारी गोवठणे ग्रामस्थ मंडळ करीत असून, जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper