Breaking News

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या समावेशनासाठी आज पनवेल ते मंत्रालय लाँग मार्च

पनवेल ः येथील परिसरातील 23 ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समायोजन व्हावे यासाठी बुधवारी (दि. 22) पनवेल ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार व सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली.
पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी नगर परिषदेसह तालुक्यातील 29 गावांतील 23 ग्रामपंचायती मिळून करण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यानंतर नगर परिषदेतील आणि 23 ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियम कलम 493/5-कने समायोजन होणे कायद्यान्वये बंधनकारक होते, पण ते प्रशासकीय दिरंगाईमुळे झाले नाही. यासंदर्भात पालिकेतील सत्ताधारी, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केले, परंतु राज्य सरकार बदलल्यानंतर निर्णयप्रक्रिया थांबलेली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply