पनवेलमधील वांगणी तर्फे वाजेत विविध कामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 13) झाले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या कामांमध्ये रा.जि.प. शाळा मोहो दुरुस्ती करणे (चार लाख रुपये), मोहो येथे स्मशानभुमी बांधणे (12 लाख रुपये), मोहो येथे अंतर्गत पेवर बॉल्क बसविणे (आठ लाख रुपये), मोहोचापाडा येथे अंगणवाडी बांधणे (आठ लाख 50 हजार रुपये), पाली खुर्द येथे अंगणवाडी बांधणे (आठ लाख 50 हजार रुपये), पाली खुर्द येथे अंतर्गत काँक्रेटीकरण करणे (आठ लाख रुपये), लोणीवली येथे अंगणवाडी बांधणे (आठ लाख 50 हजार रुपये), आंबीवली येथे अंगणवाडी बांधणे (आठ लाख 50 हजार रुपये), रा.जि.प. शाळा आंबीवली दुरुस्ती करणे (चार लाख रुपये), रा.जि.प. शाळा लोणीवली दुरुस्ती करणे (चार लाख रुपये), वांगणी येथील अंगणवाडी दुरुस्ती करणे (एक लाख रुपये) या कामांचा समावेश आहे.
या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेखा अशोक पवार, उपसरपंच अक्षदा प्रवीण म्हात्रे, माजी सरपंच गुरूनाथ भोईर, माजी उपसरपंच संतोष गोविंद शेळके, प्रमोद म्हात्रे, प्रवीण पालव, सदस्य संतोष पाटील, भाजप विचुंबे विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, अतिश मालुसरे, दीपक भालेकर, बळीशेठ मालुसरे, बबन मालुसरे, नथू मालुसरे, गोपीनाथ भालेकर, भाऊ पाटील, सुभाष पाटील, दत्तात्रेय शेळके, राम शेळके, बाळाराम गाताडे, आप्पा पाटील, गणेश पाटील, मयुर घरत, राम म्हस्कर आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper