Breaking News

ग्राहकांना वाढीव वीज बिलामध्ये मिळणार सूट

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : प्रतिनिधी

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततचा पाठपुरावा व प्रयत्नांना यश आले असून सदर बाबत शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव वीज बिलामध्ये 20 ते 30 टक्के सूट देण्यात येणार असून त्याचा 93 टक्के वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबईतील वीजग्राहकांना महावितरण कंपनीने देण्यात आलेली वाढीव बिलाची रक्कम कमी करणे तसेच बिलाची रक्कम भरण्यास मुदतवाढ व हप्त्याने भरण्याची मुभा मिळण्याकरीता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच उर्जा मंत्री नितीन राऊत यांजकडे मागणी केली होती. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील वीज ग्राहकांना अवाढव्य वाढीव वीज रकमेची बिले रीडिंग न घेता वितरीत करण्यात आली होती. या वाढीव वीज रकमेची बिले कमी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या आधीच नागरिक कोरोनाची लढाई लढत असतांना महावितरणाने दिलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक अधिकच भयभीत झाले होते. या मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही  देण्यात आला होता. या बाबत शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून वाढीव वीजबिलामध्ये 30 टक्के सूट देण्यात आलेली आहे. याचा फायदा 93 टक्के वीज ग्राहकांना होणार असून वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply