नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने काही दिवासांपूर्वी विनी रमण या भारतीय वंशाच्या मुलीशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. आता या दोघांनी साखरपुडा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला आहे.मॅक्सवेलने गेल्या महिन्यात विनीला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही केला होता. आता या दोघांनी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. विनीने या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. मॅक्सवेल आणि विनी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या दोघांनी त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. भारतीय पद्धतीने केलेल्या साखरपुड्यासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper