Breaking News

चांगले काम करणार्‍या प्रत्येकाला भाजपमध्ये संधी -लोकनेते रामशेठ ठाकूर

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दक्ष -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
चांगले काम करणार्‍या प्रत्येक माणसाला भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खिडूकपाडा येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सांगितले की, सबका साथ सबकाविकास हा मंत्र घेऊन सर्व जनसामान्यांची कामे करूयात नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी दक्ष राहुयात हे काम केल्यास भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा रथ कोणीही रोखू शकत नाही, असे सांगितले तसेच कामांचा झंझावात जो प्रभूदास भोईर यांच्या माध्यामतून सुरू आहे त्यामुळे इतरांनाही प्रेेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन केले.
पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून भारतीय जनता पक्ष खिडूकपाडा तसेच प्रभूदास भोईर आणि सुरेश भोईर यांच्या वतीने रुग्णसेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय खिडूकपाडा येथे सुरू करण्यात आला आहे. या जनसंपर्क कार्यायालयचे उद्घाटन आणि रुग्नवाहिका लोकार्पण सोहळा सोमवारी आयोजीत करण्यात आला होता. या रुग्नवाहिकेचे लोकार्पण आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पक्षप्रवेश करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेशचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दि.बा.पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कळंबोलीश मंडळ अध्यक्ष अमर पाटील, नावडे मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक बबन मुकादम, गणेश कडू, रवींद्र भगत, महाराष्ट्र वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोर्ईर, शंकुनाथ भोईर, सुरेश भोईर, जितेंद्र म्हात्रे, सरस्वती काथारा, अतुल घरत, शशिकांत शेळके आदी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply