भाजप ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय उरला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादीत करावे, असा मोलाचा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी न्हावे येथे वह्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी दिला. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीस वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड 2 यांच्या संयुक्त विद्यमाने न्हावे आणि न्हावेखाडी गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि.2) झाला.
या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या न्हावे आणि न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यामना वह्यांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून त्यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, भाजप नेते हेमंत ठाकूर, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सदस्य सागर ठाकूर, योगिता भगत, विश्वनाथ कोळी, उद्योजक चंद्रकांत भोईर, उलवे नोड 2चे उपाध्यक्ष अनंता ठाकूर, सी.एल.ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, अरुणशेठ ठाकूर, राजेश म्हात्रे, शैलैश पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, मंजूषा ठाकूर, प्रकाश कडू, मिनाक्षी पाटील, श्रीधर मोकळ, वामन म्हात्रे, सुदर्शन भगत, सुहास भगत, प्रमोद कोळी, विनायक कोळी, ललिता ठाकूर, स्नेहलता ठाकूर,राम मोकल, संजना पाटील, स्वप्ना भोईर, रेश्मा ठाकूर, सदाशिव ठाकूर, नामदेव बांगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper