आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून चांदोरे बौध्दवाडी (ता. माणगाव)मधील एका इसमाला तिघा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 2) संध्याकाळी घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदोरे बौद्धवाडी येथील फिर्यादी अनंत तुळशीराम तांबे (40) यांनी मंगळवारी (दि. 1) नामदेव रामचंद्र वाघमारे याच्यावर तू दारूचा धंदा करतोस, असा आरोप केला होता. त्याचा राग धरून नामदेव वाघमारे आणि त्याची दोन मुले गणपत वाघमारे व राजन वाघमारे (सर्व रा. चांदोरे आदिवासीवाडी) यांनी बुधवारी संध्याकाळी अनंत तांबे घरात एकटेच असताना त्यांच्या घराजवळ जाऊन त्यांना शिवगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच राजन वाघमारे याने लाकडी काठी अनंत तांबे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी अनंत तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper