
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली चांभार्ली व अळीआंबिवलीतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 1) प्रवेश केला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे, दत्ता जांभळे, प्रवीण जांभळे, ज्ञानेश्वर मुंढे, अरुण दळवी, मंदार गोपाळे, प्रमोद कांबळे, अमित मांडे, अविनाश गाताडे, प्रमोद जांभळे, सचित कुरंगळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश सुरेश मुंढे, जयदत्त जगन्नाथ भोईर, रुपेश अनंता मुंढे, मारुती गोमा जांभळे, अमर सुरेश मुंढे, प्रमोद मारुती घोरपडे, केतन दत्तात्रय जाधव, चेतन दत्तात्रय जाधव, सुशांत संजय जाधव, अरविंद काशिनाथ वाकडीकर, वैभव पांगत, जय सुरेश मुंढे, दीपक कुंडलिक गुडेकर, प्रणित मुंढे, नितेश ज्ञानेश्वर मुंंढे, कैलास सीताराम मुंढे, समीर मारुती जांभळे, संदेश कुंडलिक मुंढे आदींनी भाजपत प्रवेश केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper