Breaking News

चिकणी आदिवासीवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

नागोठणे : प्रतिनिधी

जिल्हा नियोजन अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास निधीतून राष्ट्रीय महामार्ग 66 ते चिकणी आदिवासीवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने काम करता येऊ शकले नव्हते. आता या कामाला 25 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर यांनी दिली.

महामार्ग ते आदिवासीवाडी या मार्गाचे अंतर एक हजार पन्नास मीटर इतके आहे. पूर्वी करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असल्याने आदिवासी बांधवांना या मार्गावरून चालणेसुद्धा खडतर झाले होते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केला.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply