
पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, सरपंच नामदेव पाटील, सदस्य रमेश गडकरी, रविंद्र गडकरी, सूर्यकांत पाटील, सदस्या पद्मिनी गडकरी, जयश्री पाटील, सुरेखा पाटील, सदस्या मोहिनी पाटील, सदस्या निकिता पाटील तसेच ज्ञानेश्वर मेढेकर, राम फड़के, योगेश पाटील, रविंद्र मेढेकर, हिरामन पाटील, तुकाराम पाटील, सूरज पाटील, प्रशांत पाटील, दिनेश पाटील, नितेश पाटील, विशाल फडके, ऋषिकेश मेढेकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper