Breaking News

चिरनेर वनक्षेत्रात साकारले नक्षत्र वन

उरण : प्रतिनिधी

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नेहमी अग्रेसर असणार्‍या वन्यजीव निसर्ग संरक्षण आणि वटवृक्ष फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या सहकार्याने चिरनेर हद्दीतील वनक्षेत्रावर सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 3) नक्षत्र वन निर्माण करण्यासाठी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले.

या संकल्पनेनुसार विविध प्रकारच्या जंगली पण औषधी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक नक्षत्रामध्ये फुलफळाला येणारी ही झाडे जनतेसाठी आयुर्वेदिक औषधांचा साठा असणार आहेत. ही झाडे लावून त्यांचे उन्हाळ्यात व्यवस्थित संगोपन करण्यात येईल, असा निर्धार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वृक्षारोपणासाठी लागणारी बहुमूल्य झाडे वटवृक्ष फाउंडेशन संस्थेचे कार्यकर्ते किरण मढवी यांनी उपलब्ध करून दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply