उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्प मित्र संस्थेच्या सदस्यांनी चिर्ले-गावठाणच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका घुबडाला जीवदान देण्याचे काम केले आहे.
चिर्ले गावठाण येथे कावळ्यांनी घुबडावर केलेल्या हल्ल्याने आपला जीव वाचविण्यासाठी घुबड विश्वास यांच्या घरामध्ये शिरला. या वेळी त्वरित विश्वास याने वन्यजीव निसर्ग सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांना बोलावून त्या घुबडाला पकडण्यात आले.
घुबड हे निशाचर असल्याने आणि त्याला दुखापत झाली असल्याने सहजच पकडले गेले. त्या घुबडाला वनाधिकार्यांच्या परवानगीने ऑफझर्वेशनमध्ये ठेवून त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले. घुबड हे पक्षी जगात सर्वत्र आढळणारा पक्षी आहे, परंतु कालांतराने ह्या घुबडाच्या जाती नामशेष होऊ लगल्या आहेत. याला कारण आहे वाढते प्रदूर्षण लाईटचे पोल मोठमोठ्या उंच गगनचुंबी इमारती होय.
हा पक्षी निशाचर असल्याने रात्री आपले भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. भक्ष शोधत असताना रात्री विजेचे पोल इमारतींवरील टॉवर यांना आदळून मृत्यू होत आहे, तसेच जंगलांना लागलेल्या आगीमुळे झाडे ही जळून गेली आहेत झाडांच्या ढोलीमध्ये असलेली पिल्ले तसेच अंडी या आगीमुळे जळाली आहेत. हे पक्षी वाचणे ही काळाची गरज आहे. हेच पक्षी आणि प्राणी वाचविण्यासाठी वन्यजीव निसर्ग संरक्षण, सर्पमित्रसारख्या संस्था आपल्या जीवाची बाजी लावून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी गावातील नागरिकांचे ही त्यांना सहकार्य मिळू लागले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper