चोरीच्या घटनांना आवर घाला

वाशी पोलिसांना भाजपकडून निवेदन

नवी मुंबई : बातमीदार

वाशी परिसरातील विविध भागात मोठ्या प्रमाणत चोर्‍या होत आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी महत्त्वाची कार्यालये, वास्तू, मोठ्या गृह निर्माण सोसायट्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणावा. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका अंजली वाळूंज यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे निवेदन देऊन केली आहे.

बी / 2 टाईप सेक्टर 16 या ठिकाणी घरफोडी व चोरीची ताजी घटना घडली आहे. अलीकडच्या काळात अनेक घरफोडीच्या व सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना झालेल्या असून सदर बाब चिंताजनक आहे. विभागामध्ये मॉर्डन कॉलेज, हेड पोस्ट ऑफिस, एम. टी. एन. एल, विष्णूदास भावे नाट्यगृह, सेंट लॉरेन्स स्कूल, वॉर्ड ऑफिस, अशा अनेक महत्त्वाच्या इमारती असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वरदळ असते. याचाही विचार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

वाशी येथील सेक्टर 15,16,16 ए या ठिकाणी नागरिकांची चांगली वर्दळ असते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून विभागात पालिस गस्त वाढवून पोलिस चौकी स्थापित करणे गरजेचे आहे. असून तत्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, अशी विनंतीदेखील निवेदनातून केली आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply