Breaking News

चौल येथील पोहण्याच्या शर्यतीत अमर पाटील प्रथम

रेवदंडा : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौल रामेश्वर पुष्करणीत पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खुल्या गटात अमर वासुदेव पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. व्दितीय क्रमांक भारत कुथे व तृतीय भूषण शिर्के यांनी पटकाविला.
स्पर्धा एकूण 14 गटात घेण्यात आली. गट क्रमांक एकमध्ये मुले डबल फेरी प्रथम अमर पाटील, व्दितीय अमित पाटील, तृतीय प्रथमेश गर्जे, गट क्रमांक दोन मुले डबल फेरी प्रथम भारत कुथे, व्दितीय ॠतिक शिर्के, तृतीय संदीप भोईर, गट क्रमांक तीनमध्ये प्रथम स्वप्नील तांडेल, व्दितीय ओंकार वादळ, तृतीय आयुष चेरकर, गट क्रमांक चारमध्ये मुली प्रथम सई संजय पिळणकर, व्दितीय निरव वर्तक, तृतीय साई मंगेश पिळणकर, गट क्रमांक पाच मुले प्रथम अर्थव सचिन घरत, व्दितीय ऐश्वर्य अनिल घरत, तृतीय प्रिन्स भूषण पाटील, गट क्रमांक सहा मुले रिले प्रथम आदित्य घरत व ओमकार जाधव, व्दितीय हेमंत जाधव व विनायक नाईक, तृतीय जितेंद्र जाधव व आर्य जाधव, गट क्रमांक सात मुले रिले प्रथम अमर पाटील व अमित पाटील, व्दितीय ॠतिक शिर्के व भारत कुथे, तृतीय संकेत म्हात्रे व भावेश कडू, गट क्रमांक आठ मध्ये ओंढे बांधून मुली प्रथम गार्गी रवींद्र राऊळ, व्दितीय आर्या विनोद नाईक, तृतीय मानसी नरेश नाईक, गट क्रमांक नऊ मध्ये मुली खुला गट प्रथम स्वराली बाळकृष्ण म्हात्रे, व्दितीय स्वप्नाली बाळकृष्ण म्हात्रे, तृतीय पूर्वा नंदकुमार टेकाळकर, गट क्रमांक दहामध्ये मुले सिंगल फेरी प्रथम भावेश निलेश कडू, व्दितीय प्रथमेश गर्जे, तृतीय दिवेश हाले, गट क्रमांक अकरामध्ये मुले सिंगल फेरी प्रथम संकेत म्हात्रे, व्दितीय साईल सुरेश कुथे, तृतीय दक्ष नाईक, गट क्रमांक बारामध्ये रामेश्वर गट प्रथम जितेंद्र जाधव, व्दितीय हेमंत जाधव, तृतीय ॠषिकेश घरत, गट नंबर तेरा सिंगल फेरी प्रथम मानस टिवळेकर, व्दितीय चिराग हाले, तृतीय संस्कार महेश पिळणकर, गट क्रमांक चौदामध्ये प्रथम अमर पाटील, व्दितीय भारत कुथे, तृतीय भूषण शिर्के यांनी यश संपादन केले. विजेत्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रोख रकम व स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply