गव्हाण : रामप्रहर वृत्तयेथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजच्या दहावी परीक्षेचा निकाल 93.13 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक शिवानी शरद काबुगडे (92.20), द्वितीय क्रमांक विशाखा राजेंद्र सुर्वे (91.80) व तृतीय क्रमांक ऋतुजा शरद कर्णे (89.40) या विद्यार्थिनींनी पटकावला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व प्राचार्य साधना डोईफोडे (खटावकर) यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, सदस्य विश्वनाथ कोळी यांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. यंदा विद्यालयातील 204 विद्याथ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य प्राप्त करणारे एकूण 49 विद्यार्थी, तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या 90 आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper