Breaking News

छायाचित्रकार समीर मोहिते यांना पुरस्कार जाहीर

 मुरूड : छायाचित्रकारितेत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने कोकणचे सुपुत्र समीर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा छायाचित्रकार पदवी पुरस्कार जाहीर केला आहे.

समीर मोहिते गेली 15 वर्षे छायाचित्रण क्षेत्रात काम करीत आहेत. भारतातील विविध राज्यांच्या छायाचित्रणातील 32 विशेष पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तर विविध 50 देशांच्या स्पर्धेत त्यांच्या 2000 छायाचित्रांना स्वीकृत प्रमाणपत्रे मिळाली. त्याची दखल घेत फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिकेने मोहिते यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply