मुरूड : प्रतिनिधी
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून आंध्र प्रदेश अकादमी-विजयवाडा या संस्थेने मुरूड येथील प्रसिध्द छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना अमेरिकेची एक्सलन्स फेडरेशन मल्टीकल्चरल फोटोग्राफिक आर्ट (एऋचझअ) ही पदवी प्रदान केली. ही पदवी प्राप्त करणारे सुधीर नाझरे रायगड जिल्ह्यातील पहिले छायाचित्रकार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुधीर नाझरे हे 1999सालापासून वृत्तपत्र छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना विविध देशाच्या जागतिक छायाचित्रण स्पर्धेत अनेक पदके मिळाली आहेत. नाझरे यांची महाराष्ट्रात 12 ठिकाणी फोटो प्रदर्शने झाली आहेत, तर 29 विविध पुरस्काराने गौरविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper