Breaking News

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

मुरूड : प्रतिनिधी

राजपुरी येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे खोरा बंदर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची तोबा गर्दी होती. राजपुरी नवीन जेट्टी येथेसुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून आली. सुट्टी असल्यामुळे रविवारी नाशिक, औरंगाबाद, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, मुंबई, ठाणे आदी भागातील पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदर येथून पर्यटकांना शिडाच्या व मशीन बोटीद्वारे जंजिरा किल्ल्यावर नेले जाते. या भागात पर्यटक व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. किल्ल्याच्या परिसरात असणारी सर्व हॉटेल्स व छोट्या टपर्‍यांवरही पर्यटकांची गर्दी दिसून आली. त्यांना टप्याटप्याने होडीद्वारे जंजिरा किल्ल्यावर नेले जात होते. पर्यटकांची संख्या वाढल्याने शिडाच्या बोटींवर काम करणार्‍या कामगारांची धावपळ उडाली होती. मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनार्‍यावरही पर्यटक व त्यांच्या वाहनांची गर्दी होती.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply