Breaking News

जनता विद्यालयाचे स्नेहसंमेलन; 27 वर्षांनंतर मित्र आले एकत्र

रसायनी : प्रतिनिधी

रसायनी परिसरातील जनता विद्यालय मोहोपाडा शाळेत 1992 मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराचा स्नेहमेळावा नुकताच एस. पी. फार्मला झाला.

1988 मध्ये सहावीत प्रवेश घेतला. गरिबीची झळ सोसत 1992 मध्ये दहावी पार केली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोणाचीही भेटगाठ होत नव्हती. प्रत्येक जण आपापल्या संसारात प्रपंचात व्यस्त होता, पण अचानक सोशल नेटवर्कच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आम्ही भेटू लागलो. एकमेकांना आम्ही जोडले गेलो आणि निघू लागल्या जुन्या आठवणी. असे करता करता गेट टुगेदर घेण्याचे ठरवले.नागेश कदम याने जागेचे नियोजन करून निसर्गरम्य वातावरणात आम्ही सर्व एकत्र जमलो. या वेळी आम्ही पंचेचाळिशी गाठली होती. कोणी कोणाला ओळखत नव्हते. प्रत्येक जण प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहत होता.

मग सर्वांनी प्रत्येकाची ओळख करून दिली. कोणी शिक्षक, वकील, पत्रकार, राजकिय, व्यावसायिक सर्वांच्या तोंडून परिचय होत असताना प्रत्येकाचे अश्रू अनावर झाले होते. यानंतर गेट टुगेदर म्हणून नागेश कदम, राजू बाफना, अनिल म्हस्कर यांनी एकदिवसीय कार्यक्रम करण्याचे ठरविले. या वेळी एसपी फार्ममध्ये सर्वांनी जाऊन 27 वर्षांनंतर एकत्र आल्याचा आनंद साजरा केला. या वेळी गाणे, नाच, उखाणे आदी कार्यक्रम झाले. यानंतर उपस्थित 25 सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी सर्वांनी आपापल्या कुटुंबाची माहिती सांगितली आणि वेळ आली ती घरी जाण्याची, निरोप घेण्याची. पुन्हा कधी भेटू या असे म्हणताक्षणी मन भरून आले. अखेर मैत्री जपून ठेवा. कोन कधी कामी येईल हे सांगता येत नाही आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply