पनवेल : तळोजा येथील रॅपीड अॅक्शन फोर्समधील सुनील भोये (35) या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कौटुंबिक कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेतील मृत सुनील भोये हे तळोजा येथील रॅपीड अॅक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते, तसेच ते आरएएफमधील कॉर्टर्समध्ये पत्नीसह राहण्यास होते. पत्नी झोपेत असताना सुनील भोये यांनी हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर तिने आरडा-ओरड केल्यानंतर आरएएफमधील अधिकार्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली, मात्र या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
Check Also
‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील …
RamPrahar – The Panvel Daily Paper