मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघातील यॉर्कर किंग गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना शंभर गडी बाद करण्याचा मान मिळविला. भारताकडून सर्वात जलद बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 57व्या सामन्यात ही कामगिरी केली.भारताकडून सर्वाद जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 सामन्यांत हा पराक्रम केला आहे. त्यापाठोपाठ इरफान पठाण (59 सामने), झहीर खान (65 सामने), अजित आगरकर (67 सामने) आणि जवागल श्रीनाथ ( 68 सामने) यांचा क्रमांक येतो. बुमराहने या क्रमवारीत दुसर्या स्थानी झेप घेतली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper