Breaking News

जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पक्षाच्या समक्ष नेतृत्वावर विश्वास ठेऊन उरण मतदार संघातील जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच विद्यमान ग्रामपंचाय सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
सर्व प्रवेश कर्त्यांचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत करुन त्यांनी जो विश्वाश ठेऊन पक्षात प्रवेश केला आहे तो सार्थ ठरवणार, अशी ग्वाही दिली. पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी जांभिवली येथील शेकापचे जयंता कोंडीलकर, विद्यमान ग्रामपंछायत सदस्या जान्हवी काोंडीलकर, हरिच्छंद्र वाघ, अंकिता पाटील, भास्कर तांबोळी, उबाठा गटाचे काळूराम माळी, चंद्रकांत कोंडीलकर, तसेच भोकरपाडा येथील उबाठा गटचो गिरीष पाटील, लक्ष्मण पाटील, शेकापचे भास्कर
निर्गोसे, गार्गी पाटील, दिपा निर्गोसे, कांचन पाटील, कमळ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, साई ग्रामंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील, किरण माळी, अविनाश नाताडे, विजय मुरकुटे, कर्णा शेलार, मंगेश लबडे, प्रफुल्ल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी माजी सरपंच विद्याधर मोकल यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला असून आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply