Breaking News

जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष व्याख्यान

पोलादपूर : प्रतिनिधी

जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने 1 डिसेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान व जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले.ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या आयसीटीसी केंद्राच्या प्रयोगशाळा महिला तंत्रज्ञ सीता जाधव यांनी प्रमुख व्याख्यानात आपण बदल घडवू शकतो, या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत एचआयव्ही विषाणूंची लागण, त्याबाबतच्या विविध चाचण्या, सध्या एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेले उपचार याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस रासेयोच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयश्री पाटील-जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply