नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था
भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियापाठोपाठ भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियानेही जागतिक कुस्तीत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले. रवीने इराणच्या रेजा अहमदालीला 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या कामगिरीसह त्यानेही टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
दीपक पुनियाही करणार ‘टोकियो’वारी
युवा गटात विश्वविजेतेपद पटकावणार्या दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत विजय मिळवला आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळवले. या विजयासह तो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, माजी सुवर्णविजेता सुशील कुमारला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 74 किलो गटाच्या सामन्यात अझरबैजानच्या खाजीमुरादने सुशीलवर 11-9 अशी मात केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper