पनवेल : वार्ताहर
कळंबोली येथील जागृती महिला मंडळाने मंगलेश्वरी माता मंदिराजवळ से. 6 मध्ये मेडिकल कॅम्पमध्ये पाच हजार वर्षे पूर्वीच्या व्हॅक्युम थेरेपी अॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर करून सायटीका स्लीपडिस्क, स्पाँडेलिसीस, फ्रोझन, शोल्डर मायग्रेन, डिप्रेशन पॅरालिसीस यासारख्या अनेक आजारांवर डॉ. अनिल जानी यांच्या माध्यमातून औषधाशिवाय मोफत उपचार शिबिराचे आयोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका विद्या गायकवाड, सीतू शर्मा, नगरसेवक अमर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. जानी यांनी सांगितले की, या थेरपीचा वापर केल्यास औषध घेण्याची गरज लागत नाही. त्यात अनेक गंभीर आजारांवर खात्रीशीर लगेच उपचार सुरू करण्यात येतात. पहिल्याच उपचाराच्या वेळी रुग्णास 60 टक्के फरक पडत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 27 वर्षापासून त्यांनी हे समाजकार्य सुरू ठेवले आहे. या शिबिरासाठी सावित्री नायर व जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper