क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील तारा येथे इलेव्हन स्टार क्रिकेट संघ आणि भाजप युवा नेते रोहन पाटील यांच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभास जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, युवा नेते चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, आयोजक रोहन पाटील, भाई पाटील, पांडुरंग पाटील, बालाजी पाटील, हरिभाऊ म्हात्रे, जितेंद्र पाटील, उमेश पाटील, शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र म्हात्रे, अश्फाक दाखवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोगत व्यक्त केले. ही स्पर्धा 24 फेबु्रवारीपर्यंत रंगणार आहे.

RamPrahar – The Panvel Daily Paper