उरण : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या रायगड विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी (दि. 18) झाल्या. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व कामगार नेते सुरेश पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना उदबोधन केले की विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपली गुणवत्ता वाढविली पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे, माजी पं. स. सभापती नरेश घरत उपस्थित होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील सर्व शाळेतील विद्यार्थी ग्रुप सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील, पर्यवेक्षिका एस. सी. म्हात्रे, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक शेख सर यांनी यशस्वीपणे केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल पाटील यांनी केले. विभागीय कार्यालयातील लेखनिक गुजर सर, गावंड सर, विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
RamPrahar – The Panvel Daily Paper