उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन, महिला मुक्ती दिन विद्यालयात साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव अध्यक्ष सल्लागार समितीचे सदस्य यशवंत घरत, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेखसर, राजस्थानचे पत्रकार सत्पालसिंग चौहान, मनोज जैन, राजुजी मराठा, अनिल गहलोत, विद्यालयातील शिक्षक डि. बी. म्हात्रे, टी. टी. घरत, लेखनिक सुरेश ठाकूर, शिपाई पांडुरंग मुंबईकर, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper