उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील हे होते. त्यांनी अल्प संख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरा यांचे संवर्धन करता यावे म्हणून राज्य घटनेने जे अधिकार दिले आहेत त्यांची माहिती आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषणात विद्यार्थ्यांना दिली.
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनीही मनोगतात विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करून दिली. रयत सेवक संघाचे समन्वयक एन. एच. शेख व नेहा हुदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एस. साळुंखे व सर्वसेवक वर्ग आणि विद्यार्थी, तसेच यशवंत घरत, सुभाष घरत, बाळाशेठ पाटील इत्यादी शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
या अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper