Breaking News

जिते ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना मानाची भाऊबीज

कर्जत, कडाव : बातमीदार

दिवाळी सणानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीमधील भवानी माता मंदिरात परिसरातील महिलांसाठी मानाची भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे कर्जत तालुका संघटक राजेश जाधव यांच्या सक्रिय पुढाकाराने गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येत आहे.

 शिवसेना शाखा जिते, ग्रुप ग्रामपंचायत जिते आणि गायत्री बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या उत्कृष्ट अशा कार्यक्रमात महिलांना साडीचोळी तसेच मिठाई आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी राजेश जाधव आणि जिल्हा परिषदेतील माजी

पक्षप्रतोद सावळाराम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    या वेळी शिवसेना कर्जत संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, पंचायत समिती उपसभापती काशीनाथ मिरकुटे, जिते ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायकवाड, उपसरपंच ज्योती भगवान जाधव, सदस्य दिलीप घरत, दशरथ जाधव, तानाजी जाधव, वामन जाधव, भगवान गायकवाड, काशीनाथ जाधव, प्रभाकर जाधव, भगवान जाधव, अमोल जाधव, दीपक भोईर आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply