Breaking News

जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुका चॅम्पियन

पेण : प्रतिनिधी
पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत
पेणमधील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत रवींद्र म्हात्रे, विनायक पाटील तसेच प्रथमेश मोकल यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी 45 सुवर्ण, 43 रौप्य आणि 18 कांस्यपदके जिंकून प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविण्याचा मान मिळविला.
स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जवळपास 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन निलेश भोसले यांनी केले होते. रायगड जिल्ह्यातून प्रशांत घांगुर्डे, चिंतामणी मोकल, सागर कोळी, प्रतिक कारंडे, संजय पाटील, शैलेश खोब्रागडे, संजय गमरे, स्वप्नील वारंगे या सर्व प्रशिक्षकांनी आपापल्या तालुक्यातून खेळाडूंना खेळण्यासाठी आणले होते.
सर्व विजयी खेळाडूंची आळंदी येथे होणार्‍या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सर्व खेळाडूंना महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष मंदार पनवेलकर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply