पनवेल ः प्रतिनिधी
उरण तालुक्यातील 1984 साली जासई येथे झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मा झाले. या हुतात्म्यांचा 36वा स्मृतिदिन गुरुवारी (दि. 16) झाला. त्यानिमित्त चिर्ले येथील हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, जितेंद्र घरत, सुरेश पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, भाजप महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, चंद्रकांत घरत, अतुल पाटील, जे. डी. तांडेल, भूषण पाटील, दिनेश पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper