
विचुंबे (ता. पनवेल) : येथील पुलावरील रस्ता खचल्याचे वृत्त समजताच जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांसमवेत पुलावर जाऊन पाहणी तसेच रस्त्याची डागडुजी केली. याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, सचिन वाघमारे, डी. के. भोईर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. पवार, श्री. डोंगरे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper