रायगड : प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या मतदार यादीसंदर्भात आवश्यक त्या दुरुस्त्या व इतर बदल केले असून, बिनचूक व परिपूर्ण यादी तयार केली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली.
मतदारांनी कोणत्याही प्रकारे संभ्रम ठेवू नये तसेच मार्गदर्शनासाठी हेल्प लाईन, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदार फोटो ओळखपत्रांचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून 22 हजार 539 दुबार नोंदणी मतदार वगळले आहेत. एवढेच नव्हे तर 65 हजार 107 जणांच्या दुरुस्त्या झाल्या असून, 23 हजार 136 मृत मतदारांची नावे वगळली आहेत. जिल्ह्यात 2693 मतदान केंद्रे असून, सर्व ठिकाणी सुविधा पुरविण्यात येत असून त्यात दिव्यांग मतदारांचाही प्राधान्याने विचार केला आहे.
रायगड जिल्ह्यात 1 जानेवारी 2019 च्या अंतिम यादीनुसार एकंदर 22 लाख 259 मतदार असून 11 लाख 19 हजार 743 पुरुष व 10 लाख 80 हजार 513 महिला, आणि 3 तृतीयपंथी मतदार आहेत.
-वैशाली माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
RamPrahar – The Panvel Daily Paper