लंडन : वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप
स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला, पण या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्षा सुनावली आहे.
20व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेने गेला होता. त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅट व चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही. तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केले आणि पंच कुमार धर्मसेना यांनी रॉयला बाद ठरवले. यानंतर रॉयने तीव्र नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीने रॉयला शिक्षा सुनावली आहे.
रॉयला त्याच्या सामना मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. शिवाय त्याला दोन डिमेरिट्स गुणही मिळाले आहेत. असे असले तरी तो अंतिम फेरीत खेळणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper