कर्जत : बातमीदार
तालुक्याच्या दुर्गम भागातील झुगरेवाडीमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी भेट म्हणून खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टनसींगच्या नियमांचे पालन करण्यात आले. झुगरेवाडी परिसरात कार्यरत असणार्या आणि प्राथमिक शाळा दत्तक घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापक रवी काजळे यांना दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या या शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च रोटरी मार्फत करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष निमेश संघरजिका, सबिना गुप्ता, कविता गोडबोले, जान्हवी संगर्जीका यांनी सांगितले. शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण झुगरे, उपाध्यक्ष वसंत पारधी, गणपत केवारी, केंद्रप्रमुख दरवडा, सुनील सावळा, चंदर केवारी, भास्कर केवारी शिक्षक गणेश चोरघे, संतोष कोरडे, आनंद कराळे, सतीश घावट यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित यावेळी होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper