केपटाऊन ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता भारतीय संघ क्वारंटाइन झाला आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि गुरुवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेत पोहचला आहे. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये तयारी सुरू करण्यापूर्वी 18 खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये नियमानुसार क्वारंटाइन असतील. भारतीय संघ 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका शेवटचे स्थान आहे, जिथे भारत मालिका अद्याप जिंकलेला नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेत 20 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघ फक्त तीन सामने जिंकू शकला आहे. 2018च्या शेवटच्या दौर्यावर त्यांनी खडतर आव्हान दिले होते, तरीही भारताने 1-2 अशा फरकाने मालिका गमावली. आता हे अपयश पुसून काढण्याचा प्रयत्न ‘विराटसेना’ करेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper