Breaking News

टी-20 स्पर्धेत थरार सहा चेंडूंत सहा षटकार मारून संघाला केले विजयी

गिब्सन पार्क ः वृत्तसंस्था

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले अनेक थरारक सामने आजवर झालेले आहेत, पण विजयासाठी एका षटकात 35 धावांची गरज असताना एका फलंदाजाने सहा चेंडूंत सहा षटकार मारून अशक्यप्राय वाटणारा विजय संघाला साकारून दिला आहे. आयर्लंडमधील स्टील्स टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. क्रेगाघो आणि बालीमेना या दोन संघांत हा सामना झाला. शेवटच्या षटकात 35 धावा हव्या होत्या. बालीमेनाचा कर्णधार जॉन ग्लासने सलग सहा षटकार ठोकत आपल्या संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. आयर्लंडमधील नॉर्दर्न आयरिश क्रिकेट युनियनतर्फे लगान व्हॅली स्टील टी-20 स्पर्धा भरविण्यात येते. सामना जिंकण्यासाठी बालिमेना क्लबला शेवटच्या षटकात 35 धावांची आवश्यकता होती आणि बालिमेनाचा कर्णधार जॉन ग्लास 51 धावा काढून क्रीजवर उभा होता. शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर जॉनने षटकार ठोकत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 87 धावांसह नाबाद राहिलेल्या जॉनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याआधी जॉनचा भाऊ सॅम ग्लासने शानदार गोलंदाजी करीत हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्याने क्रेगाघोचे फलंदाज जॉन मूरी, जे हंटर आणि कर्णधार अ‍ॅरोन जॉनस्टोन यांना एकापाठोपाठ एक बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. हंटर आणि जॉन मूरी यांच्या खेळीच्या बळावर क्रेगाघोने 7 बाद 147 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बालिमेनाची सुरवात खराब झाली होती. 19व्या षटकात 7 बाद 113 अशी धावसंख्या झाली होती आणि संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडूत 35 धावांची गरज होती. त्या वेळी जॉन ग्लासने षटकारांचा पाऊस पाडत बालिमेनाला विजय मिळवून दिला.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply