Breaking News

ट्रकचोरट्यास अटक

पनवेल ः 13 लाख रुपये किमतीचा ट्रक चोरणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा ट्रक हस्तगत केला आहे.

पनवेलजवळील भारत ढाब्यासमोर कान्होबा ढाब्याजवळ जेएनपीटी रोडलगत अशोकलेलॅण्ड कंपनीचा 12 टायर असलेला ट्रक क्र.एमएच-46-एएफ-2167 हा उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इर्शान खरोटे, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस नाईक पंकज पवार, दिनेश जोशी, पोलीस शिपाई अजय कदम, राहुल साळुंखे, राजू खेडकर आदींच्या पथकाने सदर आरोपीबाबत तांत्रिक तपास वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार त्यांनी सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले.  त्याच्याकडून 13 लाख रुपये किमतीचा ट्रक हस्तगत केला आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply