Breaking News

ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!

मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकारने आयात करण्यात येणार्‍या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्‍या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे.
महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने दारूचे नवे दर जाहीर केले आहेत. यात स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क तीनशेवरून 150 टक्के करण्यात आले आहे.
सध्या आठ प्रकारच्या दारूंचे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत  तसेच इतर कंपन्यांच्या मद्याचे दरही लवकरच जाहीर केले जातील. कोणत्याही दुकानदाराने दारूचे दर कमी केले नाही तर त्याला कारवाईचा समोर जावे लागेल, असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply