Breaking News

डुलकीमुळे शास्त्री ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ड्रेसिंग रूममध्ये डुलकी घेणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल झाले

आहेत. त्यांचे मीम्सदेखील व्हायरल झालेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना चार दिवसांत संपला. हा सामना तिसर्‍या दिवशीच संपला असता, पण तळाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आफ्रिकेचा पराभव एक दिवस लांबला. या सामन्यात भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे ड्रेसिंग रूममध्ये डोळे मिटून बसल्याचे दिसून आले. त्यांच्या या फोटोवरून बरीच चर्चा रंगली अन् ते ट्रोल झाले. त्यांचे मीम्सही व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही शास्त्री अनेकदा ट्रोल झाले आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply