Breaking News

जागतिक किर्तीचे डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर चित्रपट

‘ताठ कणा’च्या स्पेशल स्क्रिनिंग शोसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जागतिक किर्तीचे न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग शो शनिवारी (दि. 21) रात्री मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत करण्यात आले.

अतिशय गरीब परिस्थितीत जन्म घेऊन, पण ध्येयवेडे होऊन डॉ. रामाणी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आवडी-निवडी न पाहता संशोधनाला महत्त्व दिले. त्यांचे नाव आज जागतिक पातळीवर गाजत आहे. मीसुद्धा त्यांच्याकडे उपचार घेतले असून माझ्या जीवनात बदल झालेला आहे. ही किमया डॉ. रामाणी यांनी केली आहे, असे सांगून त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

डॉ. पी. एस. रामाणी हे भारतातील सर्वांत मोठे न्यूरो सर्जन आहेत. त्यांनी पाठीचा कणा ताठ करण्यासाठी प्लिफ नावाची अख्या जगभरातून पहिली सर्जरी शोधून काढली आहे. अशा या व्यक्तीच्या जीवनावर ताठ कणा हा चित्रपट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहित आणि निर्माते विजय मुदशिंगीकर असून अभिनेता उमेश कामत

याने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply