नवी दिल्ली : वृत्तसंस्था
’ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून, तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्री. अॅथलेटिक्स
स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक पटकाविले.
गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणार्या हिमाने चेक रिपब्लिकमधील या स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने 52.48 सेकंद अशी कामगिरी करीत रौप्यपदक पटकाविले. सरिताबेन गायकवाड हिने 53.48 सेकंदांसह कांस्यपदक; तर एम. आर. पूवाम्मा हिने 53.74 सेकंदांसह चौथा क्रमांक प्राप्त केला.
हिमाने यापूर्वी 2 जुलैला युरोपात, 7 जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलैला चेक गणराज्यात आणि 17 जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ‘सुवर्ण’ पटकाविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper