
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. नेहमीच्या कामांतून आपल्याला दुखणे अंगावर काढण्याची वाईट सवय असते. छोट्याशा दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो व पुढेे हे किरकोळ दुखणे गंभीर आजाराचे रूप घेते. त्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी आपण आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी. आपल्या आरोग्याविषयी काही तक्रारी असतील, तर त्याविषयी योग्य ती तपासणी तज्ज्ञांकडून करून घेण्याची संधी यंदाही उपलब्ध झाली आहे. सिडको अध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि पनवेल भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिरात मोफत आरोग्य तपासणी करून घेता येणार आहे. दरवर्षी हे आरोग्य महाशिबिर आयोजित केले जाते. यंदाही या महाशिबिरासाठी नीटनेटके नियोजन विविध समित्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper